Thursday, February 16, 2012

D.T.Ed Solved Question Paper - 11

D.T.Ed Common Entrance Test
D.T.Ed Solved Question Paper - 11
1. 2011 चा 'साहीत्य अकादमी ' चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला ?

A. वार्‍याने हालते रान
B. राजपुत्र आणि डार्लिंग
C. संध्याकाळच्या कविता
D. चंद्रमाधवीचे प्रदेश

2.कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे ?

A. गोविंद विनायक करंदीकर
B. माणीक सीताराम गोडघाटे
C. गोविंद त्र्यंबक दरेकर
D. कृष्णाजी केशव दामले

3. विधानसभेत मोबाईलवर अश्‍लील क्लीप पाहत असल्याचे स्थानिक वृत्तवाहिनेने दाखविल्यानंतर ______________ राज्यातील तीन मंत्र्यांना अलीकडेच राजीनामे द्यावे लागले .

A. गोवा
B. महाराष्ट्र
C. हरियाणा
D. कर्नाटक

4. अलीकडील काळात महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने कोणत्या कायद्याचे नाव बदलून ' महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ' असे सुधारीत नामकरण केले ?

A. संयुक्त महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949
B. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949
C. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949
D. बॉम्बे महानगरपालिका अधिनियम 1949

5. ' महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ' खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेला / महानगरपालिकांना वगळता महाराष्ट्रातील उर्वरीत सर्व महानगरपालिकांना लागू आहे ?

A. मुंबई मनपा
B. मुंबई मनपा, नवी मुंबई मनपा
C. मुंबई मनपा, नागपूर मनपा
D. मुंबई मनपा, नागपूर मनपा, ठाणे मनपा व नवी मुंबई मनपा

6. ' महाराष्ट्र जिल्हा परीषद व पंचायत समिती अधिनियम 1961' मधील जि. प.सदस्य व पंचायत समिती सदस्यांना अपात्र ठरविण्यासंदर्भातील शौचालयाचे प्रमाणपत्र सादर करण्याचा कालावधी पूर्वीच्या नव्वद दिवसांवरून बदलून आता किती करण्यात आला आहे ?

A. निवडणुकीचा अर्ज भरतानाच आवश्यक
B. तीन आठवडे
C. पंचेचाळीस दिवस
D. 1 वर्ष

7. नागपूर जिल्यातील ______________ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत आहे .

A. गोरेवाडा
B. रामटेक
C. सावनेर
D. गोसीखुर्द

8. ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

A. महिला क्रिकेट
B. लॉन टेनिस
C. टेबल टेनिस
D. बॅडमिंटन

9. मार्च 2012 मध्ये कोणत्या शहरात ' द न्युक्लीयर सिक्युरीटी समीट ' अर्थात 'आण्विक सुरक्षा परिषद ' होणे नियोजीत आहे ?

A. मुंबई, भारत
B. न्यूयार्क, अमेरीका
C. सेऊल, द. कोरीया
D. टोकीयो, जपान

10. कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील 'महाविभाजन वर्ष' म्हणतात ?

A. 1991
B. 1981
C. 1931
D. 1921

No comments:

Post a Comment

Latest Exam Papers & Recruitments